New Pay Commission will give salary hike based on work; Know important update सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. सन 2026 पासून आठवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असून, यंदाचा आयोग आधीच्या वेतन आयोगांपेक्षा काहीसा वेगळा असणार आहे. आतापर्यंत स्वातंत्र्यानंतर सात वेतन आयोग लागू करण्यात आले. विशेषतः सहावा आणि सातवा आयोग हे पगारवाढीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जातात. मात्र, यंदाच्या आयोगात केवळ पगारवाढ न करता कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा मूल्यमापन केला जाणार आहे.
या नवीन वेतन आयोगात पगारवाढीचा निर्णय ‘कामगिरीच्या आधारावर’ घेतला जाणार आहे. सोशल मीडियावरून मिळालेल्या माहितीनुसार, कर्मचाऱ्यांच्या वर्षभरातील काम, प्रगती, क्षमता, उत्कृष्ट कामगिरी यांचा विचार होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये अधिक मेहनत आणि स्पर्धात्मकता वाढण्याची शक्यता आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या इतर भत्त्यांसाठी स्पष्ट पुरावे सादर करणे बंधनकारक करण्यात येणार आहे. उदाहरणार्थ, घरभाडे भत्ता, वाहन भत्ता, प्रोत्साहन भत्ता मिळवण्यासाठी कर्मचारी संबंधित ठिकाणी वास्तव्यास असल्याचा किंवा भत्त्याचा उपयोग करत असल्याचा पुरावा सादर करावा लागेल. यामुळे भत्त्यांचा गैरवापर रोखता येईल.
कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढावी म्हणून दरवर्षी परीक्षा घेतली जाणार आहे. खासगी संस्थांप्रमाणे शासकीय कर्मचाऱ्यांनाही वार्षिक परीक्षांना सामोरे जावे लागणार असून, यामार्फत त्यांची माहिती, कौशल्ये आणि कामगिरी तपासली जाणार आहे. ही संकल्पना सरकारी नोकरीत नवा बदल घडवणारी ठरू शकते.
पदोन्नती मिळवण्यासाठी आता ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करणं अनिवार्य असेल. केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपूर्वी ६ वेगवेगळे अभ्यासक्रम ऑनलाईन पूर्ण करावे लागतील. हे अभ्यासक्रम सेवाकालावर आधारित विभागले जातील. अभ्यासक्रम पूर्ण न केल्यास पदोन्नती मिळणार नाही, असा स्पष्ट आदेशही सरकारने दिला आहे.
BHEL मध्ये 515 जागांसाठी भरती; 10वी/ITI उत्तीर्णांना संधी, पगार 65000 पर्यंत